Ad will apear here
Next
‘सावेडीच्या विकासासाठी नागरिकांनी परिवर्तन करावे’


अहमदनगर : ‘सावेडी उपनगर ज्या वेगाने वाढत आहे, त्यामानाने येथील नागरिकांना मिळणार्‍या सुविधा कमी आहेत. यासाठीच सावेडीच्या विकासासाठी परिवर्तन करून सावेडी उपनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व नगरसेवक निवडून द्या, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.

‘भाजप’चे प्रभाग सहाचे उमेदवार आणि स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, डॉ. आरती बुगे, वंदना ताठे यांच्या प्रचाराचा नारळ खासदार गांधी यांच्या हस्ते सावेडी गावठाण येथे मारुती मंदिरात वाढविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.



ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. ही विकासाची गंगा नगरमध्ये वाहण्यासाठी महापालिकेत ‘भाजप’ची सत्ता येणे आवश्यक आहे. आता जनतेनेच निर्णय घेऊन विकासासाठी सक्षम असणार्‍या ‘भाजप’चे उमेदवारांना निवडून द्यावे.’
 
या वेळी सावेडी गावठाण परिसरातून हजारो नागरिकांच्या उपस्थित प्रचारफेरी काढण्यात आली. यात ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अ‍ॅड. अभय आगरकर, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मोहन मानधना, बाळासाहेब वाकळे, विठ्ठल बारस्कर, दिलीप बारस्कर, अशोक वाकळे, जगन्नाथ बारस्कर, राजू बारस्कर, भानुदास बारस्कर, आशा कराळे, राजेंद्र वाकळे, गजानन वाकळे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZLEBU
Similar Posts
‘विकासाच्या मुद्द्यावरच ‘भाजप’ नगर महापालिका सर करणार’ अहमदनगर : ‘केंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने केलेल्या पारदर्शी कारभारामुळे अहमदनगर महापालिकेतही ‘भाजप’ची सत्ता आल्यास विकासाच्या अनेक वाटा खुल्या होणार आहेत. विकासाच्या दृष्टीने येथे करण्यात आलेल्या सर्व बाबी लक्षात घेता या निवडणुकीत तरुण मतदार ‘भाजप’लाच विजयी करतील आणि विकासाच्या
देवेंद्र फडणवीस यांनी मानले धुळेकरांचे आभार मुंबई : ‘धुळ्यातील जनतेने जो ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विकासाच्या राजकारणावर दाखविला, तो सार्थकी लावू आणि एक स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन तेथील महापालिकेच्या माध्यमातून ‘भाजप’ देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अहमदनगर दौऱ्यात देशमुखांनी घेतल्या गाठीभेटी अहमदनगर : राज्याचे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शहरातील बँकिंग क्षेत्रातील मान्यवर, सनदी लेखापाल, तज्ज्ञ डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदींची भेट घेत शहरातील समस्या आणि विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली; तसेच नित्यसेवा येथे विडी कामगार महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली
नगर महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे २५ नोव्हेंबर २०१८ पासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. रविवारी सायंकाळी ते एक जाहीर सभा घेणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language